नाशिक: शालीमारला सव्वातीन लाखांची 600 किलो भांग जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

नाशिक: शालीमारला सव्वातीन लाखांची 600 किलो भांग जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): शालीमारच्या शिवाजी रोडवरील वावरे लेनमधील म्हसोबा मंदीराशेजारी, पत्राच्या शेडमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याची खबर मिळताच अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून सुमारे सव्वातीन लाखांची 604 किलो भांग जप्त केली आहे.

याप्रकरणी पथकाने दोघांना अटक केली आहे पोलीस आयुक्तांनी निर्माण केलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतुन निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला नाशिक शहर आयुक्तालय हददीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणा-या इसमांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: भिशीमध्ये गुंतवणूकीस भाग पाडून महिलेची ७६ लाखांची फसवणूक

भद्रकाली पोलीस ठाणे हददीत वावरे लेग, शिवाजी रोड, शालीमार, नाशिक येथे दोन इसम हे भांग हा मादक पदार्थ विक्री करत असल्याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार बाळासाहेब राम नांदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती.

सदर गोपनीय माहीतीबाबत खात्री करून अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे व विशेष पथकाने वावरे लेनमधील म्हसोबा मंदीराशेजारी, पत्राच्या शेडमध्ये शिवाजी रोड, शालीमार, नाशिक येथे छापा मारुन संशयित पवन युकदेव वाडेकर (वय २५ रा. म्हाडा कॉलनी, आडगाव शिवार, नाशिक), ज्ञानेश्वर बाळु शेलार (वय २८ रा. वावरे लेन, शिवाजी रोड, शालीमार, नाशिक) यांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:  नाशिक: अट्टल घरफोड्यास निमाणीतून अटक! 3 गुन्ह्यांची उकल

त्यांचेकडून विक्रीसाठी असलेला ६०४ किलो ३०० ग्रॅम वजनाचा एकुण ३,३०, १५३ रुपये किंमतीची भांग जप्त करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशय त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे, पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक निरीक्षक बांगर, एच. के. नागरे, पी.बी.सुर्यवंशी, हवालदार भामरे, गायकर, डाले, ताजणे, मणे, भालेराव, बाळे, कोल्हे, बाळासाहेब नहे, दिये, सानप, येवले, कुटे, वडजे, बागडे, फुलपणारे व श्रीमती मड यांनी कामगिरी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group