नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. १९ सप्टेंबर) ८७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २१९७, एकूण कोरोना रुग्ण:-४२,७६६, एकूण मृत्यू:-६३६ (आजचे मृत्यू ०६), घरी सोडलेले रुग्ण :- ३६,२३७, उपचार घेत असलेले रुग्ण:- ५८९३ अशी संख्या झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांची परिसरनिहाय यादी आज प्राप्त झालेली नाही..!
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) सुभाष रोड, मालधक्का रोड, अजमेरी गॅरेज जवळ, देवळाली गाव नाशिकरोड येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) दत्त विहार, कॅनॉल रोड, जेलरोड येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) ४०१,सन शाईन रेसिडेन्सी, बी-विंग, सुमनचंद्र सोसायटी जवळ, पखाल रोड, नाशिक येथील ५६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) कामठवाडे, अंबड, नाशिक येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) घर नंबर ८४४, रामसेतू जवळ पंचवटी येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) आडगाव, नाशिक येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.