
नाशिक शहरातील या भागात शनिवारपासून (दि. २६ मार्च) वीजपुरवठा खंडित
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये तापमान वाढत आहे.
येत्या चार दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अशातच सिडको मधील महाजन नगर येथील बारा रो हाउसचा वीजपुरवठा शनिवारपासून खंडित आहे. नाशिकच्या सिडको मधील महाजन नगर येथील 12 रो हाऊसच्या घरांचा वीजपुरवठा शनिवारी रात्री पासून बंद आहे. नागरिकांनी संबधित विभागाला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. त्यात सोमवार पासून संप असल्याने गेल्या तीन दिवसांपासून महाजन नगर मधील 18 कुटुंब अंधारात आहेत.
- 👉 शिर्डीत दर्शनासाठी लागणाऱ्या पासबाबत महत्वाची बातमी!
- Alert: नाशिकरांनो काळजी घ्या… आजपासून पुढील चार दिवस नाशिकला उष्णतेची लाट
शनिवारी रात्री अचानक लाईट गेल्यानं महावितरणचे कर्मचारी तपासणीसाठी आले होते. मुख्य वायर जळाली असल्याने लाईट गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. लाईट कधी येणार विचारले असता तीन चार दिवस लागतील असे सांगण्यात आलाय. या घरांमधील एका घरात चार महिन्याचे बाळ आहे. काही मुलांचे दहावीचे पेपर सुरू आहेत. तर कोणाला दम्याचा त्रास आहे. 24 तास लाईट नसल्यानं काय करायचं असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय. त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आलीये.