Amazon

नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि. १७ डिसेंबर) पाणीपुरवठा नाही..

नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि. १७ डिसेंबर) पाणीपुरवठा नाही..

नाशिक (प्रतिनिधी): मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ केव्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे.

सदरचे सबस्टेशन येथे विज वितरण कंपनीचे सबस्टेशन मधील विविध प्रकारची दुरुस्ती करणे करीता दि. 17/12/2022 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 वा. पावेतो महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल असे महावितरण कंपनीने कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिककरांना उकाड्यातून काहीसा दिलासा; किमान तापमानात घट

त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून नवीन नाशिक व नाशिक पूर्व भागात होणारा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याने शनिवार दि. 17/12/2022 रोजी नविन नाशिक मधील प्रभाग क्र. 24, 25, 26, 22 भागश: व 27, 28, 29, 31 या संपूर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पूर्व मधील प्रभाग क्र. 14, 15, 23, 30 भागश: या प्रभागांमध्ये सकाळ व सायंकाळचा संपूर्ण दिवसभर पाणी पुरवठा होणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध; भेसळखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

तसेच रविवार दि. 18/12/2022 रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल तरी सदर भागातील नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790