नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे.
वीज महावितरण कंपनीमार्फत ३३ केव्ही एक्सप्रेस फिडरचे लाईन शिफ्टींग व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
त्यामुळे येत्या रविवारी (२४ एप्रिल) महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद राहणार आहे.
परिणामी नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील वीज पुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत खंडित राहणार आहे.
त्यामुळे नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा रविवार सायंकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. याबाबत नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
मस्तच… कर्मयोगीनगर, गोविंदनगरमध्ये आता रात्रीची घंटागाडी सुरू
नाशिकच्या अनेक लोकांचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या बिंगो रोलेट जुगाराच्या “या” सूत्रधाराला अटक
नाशिक: उड्डाणपुलावर डिव्हाईडरवर धडक लागून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
नाशिक: गॅस गळती होऊन स्फोट, महिलेचा जागीच मृत्यू; 16 वर्षीय तरुणी जखमी