नाशिक : वणी गडावर निघालेल्या भाविकांच्या गाडीचा मोठा अपघात, 23 जण जखमी

नाशिक : वणी गडावर निघालेल्या भाविकांच्या गाडीचा मोठा अपघात, 23 जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये वणी गडावर सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरच गाडीचा अपघात झाला.

मालवाहतूक करणाऱ्या गाडीतून सर्वजण दर्शनाला चालले होते.

नाशिकमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला.

चालकाचे पिक ट्रकवरचे नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यातच उलटली. वणी गडापासून एक किमी अंतरावरच हा अपघात झाला असून यात २३ जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालेगावमधील दाभाडी इथले भाविक देवीच्या दर्शनासाठी वणी गडावर निघाले होते. सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरच गाडीचा अपघात झाला. मालवाहतूक करणाऱ्या गाडीतून सर्वजण दर्शनाला चालले होते. पिक अपमधून ३२ जण प्रवास करत होते. यातील २३ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनाला नांदुरी इथे तपासणी पथकाने पुढे कसे सोडले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group