नाशिक: लग्नासाठी आलेल्या साडूचा खून; सराईत गुन्हेगार संदीप निकाळेवर संशय

नाशिक: लग्नासाठी आलेल्या साडूचा खून; सराईत गुन्हेगार साडू संदीप निकाळेवर संशय

नाशिक (प्रतिनिधी): लग्नासाठी टिटवाळा येथून आलेल्या एकाचा रविवारी (ता.१४) मध्यरात्री दीडच्या सुमारास खून करण्यात आला. मागील भांडणाच्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज आहे.

घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत शिंदे (२९) असे मृताचे नाव असून त्याचा साडू संदीप निकाळेवर संशय असून तो फरार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भिशीमध्ये गुंतवणूकीस भाग पाडून महिलेची ७६ लाखांची फसवणूक

अनिकेत नातेवाइकांकडे लग्नासाठी आला होता. लग्न आटोपून पुन्हा टिटवाळा येथे जायच्या तयारीत असताना अनिकेतचा मोठा साडू संदीप शांताराम निकाळे (रा. बदलापूर, जि. ठाणे) याने अनिकेत यास ‘तू माझी बाजू घेत नाही, माझ्या सासरची बाजू का बरं घेतो’ यावरून दोघांत वाद झाला.

यापूर्वीही अनेकदा वादविवाद झाले होते. रविवार मध्यरात्री संदीपने आपल्या सोबत विशाल शांताराम निकाळे (रा. बदलापूर), सागर सोनवणे (रा. गोंदेदुमाला), अमोल पवार (रा. कुऱ्हेगाव) यांना बोलविले. त्यांना अनिकेतला बोलविण्यास सांगितले.

हे ही वाचा:  Breaking: जुने नाशिकमध्ये जाळपोळ करणाऱ्या पाच जणांना अटक !

अनिकेतला फोन लावून सिन्नर फाटा येथे तिघांनी बोलावून घेतले. त्यास सुरवातीला सासरची बाजू का घेतो? माझी बाजू का घेत नाही? म्हणत हातातील लाकडी दांडे, लोखंडी रॉड व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.

त्यात अनिकेतच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने अतिरक्तस्राव झाला. तशाच स्थितीत त्याला रस्त्याच्या बाजूला टाकून ते सर्व जण फरार झाले. यानंतर अनिकेत याचे मेहुणे गणेश जगताप व सहकारी यांनी घोटी ग्रामीण रुग्णालय येथे अनिकेत यास आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा:  नाशिक: अट्टल घरफोड्यास निमाणीतून अटक! 3 गुन्ह्यांची उकल

ही घटना समजताच लग्न सोहळ्यासाठी जमलेल्या नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी करत आक्रोश केला. संदीप निकाळे हा सराईत गुन्हेगार असून घटनेनंतर फरार झाला असून पोलिस तपास करत आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group