नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बारा वर्ष बलात्कार, गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर तब्बल बारा वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीसार शोएब निसार शेख (३५ रा.मदिना चौक) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात २०११ पासून प्रेमसंबध आहेत.
गेल्या बारा वर्षांच्या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या पूर्वीच्या राहत्या घरात तसेच सापूतारा, मुंबई व त्र्यंबकेश्वर आणि शहरातील विविध लॉज मध्ये घेवून जात बलात्कार केला.
- नाशिक: प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपनीच्या एरिया मॅनेजर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
- नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्यांचा मृत्यू
लग्नानंतर घर घ्यावे लागेल असा बहाणा करून त्याने पीडितेकडून भाडेतत्वावरील घराच्या डिपॉझिटसाठी तीन लाख रूपये घेतले. तसेच बुलेट आणि अॅक्सेस दुचाकी खरेदीसाठी सुमारे १ लाख ६० हजार रूपये घेतले. तरूणीने लग्नासह पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयिताने तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे पीडितेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.