नाशिक: रेस्तरॉमध्ये नोकरीत प्रमोशन देण्याचे आमिष देत युवतीवर बलात्कार
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या कॉलेजरोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असलेल्या युवतीला प्रमोशन देण्याचे आमिष देत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार कॉलेजरोड येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर पिडीत युवती कॉलेजरोडवरील एका नामांकित रेस्तरॉमध्ये नोकरीला आहे.
या रेस्तरॉच्या देश-विदेशात शाखा आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार याच रेस्तरॉचा व्यवस्थापक याने पिडीत युवतीला प्रमोशन देण्याचे आमिष दाखवत पंचवटीतील एका हॉटेलमध्ये नेले. आणि तिच्यावर बलात्कार केला. पिडीतेने नकार दिला असता “तुला प्रमोशन कसे मिळते बघ” असा दम दिला. याबाबत कुणास काही सांगू नको, अशी धमकी देत मारहाणही केली. पिडीत युवतीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयितावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०२११/२०२२) भारतीय दंड विधान ३७६ (२) (के), ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.