
नाशिक: रिक्षातील प्रवासाचा बहाणा करत लुटणाऱ्या दोन महिलांना अटक!
नाशिक (प्रतिनिधी): रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांना हेरुन त्यांच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना मुंबई नाका पोलिसांना अटक केली असून रिक्षा प्रवासातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आलेय.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा प्रवास आणि सिटी बस प्रवासाच्या दरम्यान चोरीच्या घटना समोर येत आहेत.
चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं..
मुंबई नाका पोलिस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दोन संशयित महिला बस स्टँड वर उभ्या असल्याचे दिसून आले.
- नाशिक: लहान भावाच्या पत्नीचा मोठ्या भावाकडून विनयभंग
- नाशिक: ओ मामीsss; मामी म्हटलं म्हणून राग आला, ग्राहकाची केली धुलाई!
त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी त्या दोन्ही महिलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांचे नाव लक्ष्मी व्यंकटेश गाजवा आणि भाग्या राजू गाजवा असे असल्याची माहिती मिळाली. सोबतच एक ४ वर्षाचा मुलगा देखील त्यांच्या सोबत आढळून आलाय. मुंबई नाका पोलीसांच्या हद्दीत रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागदागिने व रोकड चोरुन नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यात एका घटनेत प्राजक्ता वैभव सोनजे व भारती गांगुर्डे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारदार महिला प्राजक्ता सोनजे व भारती गांगुर्डे यांना पोलीस ठाण्यात बोलावून पकडलेल्या दोन्ही महिला व त्यांचा लहान मुलगा दाखविले असता दोन्ही महिलांनी या संशयित महिलांना व मुलाला ओळखले. त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघड झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय..