नाशिक: रिक्षाचालकाने मारहाण करत प्रवाशाला लुटले

नाशिक: रिक्षाचालकाने मारहाण करत प्रवाशाला लुटले

नाशिक (प्रतिनिधी): रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका प्रवाशाला मारहाण करत लूट केल्याचा प्रकार लक्ष्मीनारायण मंदिर ते कपिला संगम रोड तपोवन येथे उघडकीस आला.

संशयित रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडू घाटसावे (रा. पाडळी देशमुख, मुकणे ता. इतगपुरी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: जॉबचे आमिष दाखवून ११ युवकांना ६५ लाखांचा ऑनलाईन गंडा

त्यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे सोमवारी सायंकाळी रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी रिक्षा अंधारात उभी करत शस्त्राचा धाक दाखवत मोबाइल, पाच हजार रुपये घेत पोबारा केला.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: नाशिकला तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न, काका-पुतणीचा प्रतिकार
नाशिक: फूड डिलिव्हरी करणाऱ्या इसमाची आत्महत्या
धक्कादायक: पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group