नाशिक: म्हाताऱ्या आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने विहीरीत उडी घेतली; पण शेवटी….

नाशिक: म्हाताऱ्या आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने विहीरीत उडी घेतली; पण शेवटी….

नाशिक (प्रतिनिधी): आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता विहीरीत उडी घेतली. नाशिकमध्ये ही थरारक घटना घडली आहे.

नशिब बलवत्तर म्हणून आजोबा आणि नातू दोघेही या दुर्घटनेतून सुखरुप बचावले आहेत. आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक देखील होत आहे.

माणसाच्या संकट काळात कधी कोण देवासारखा धावून येईल हे सांगता येत नाही, अशीच काहीशी घटना नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथे घडली आहे.

येथील विहिरीत पडलेल्या आजोबा आणि नातवाला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. घराशेजारी असलेल्या विहिरीत दोघे पडले होते. मात्र आपत्ती व्यवस्थापनसह गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत दोघांना वाचवलं आहे.

निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात राहणाऱ्या नाते कुटुंबातील धोंडीराम नाठे हे घराच्या बाजूला असलेल्या विहिरीपासून जात होते दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले यावेळी आजोबा आजोबांचा आरडाओरडा ऐकताच जवळच असलेल्या नातू गणेश नाठे यांनी देखील विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. इतक्यात विहिरी शेजारून जात असलेल्या स्थानिक ग्रामस्थाला विहिरीतून आवाज येत असल्याने त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता, त्याला धक्काच बसला. त्याने तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाला माहिती कळवली. आपत्ती व्यवस्थापनाने घटनास्थळी धाव घेत या दोघा आजोबा नातवाला सुखरूपपणे बाहेर काढले आणि सुटकेचा निश्वास सोडला.

चांदोरी गावात गणेश नाठे यांची कुटुंबीय वास्तव्यास आहेत यांच्या मळ्यात घराजवळच एक विहीर आहे. सध्या या विहिरीला भरपूर पाणी आहे. दरम्यान शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गणेश नाठे यांचे आजोबा धोंडीराम नाठे हे विहिरी जवळून जात असताना त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. गणेश नाठे यांना विहिरीतून आवाज येत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी आजोबांना वाचवण्यासाठी उडी घेतली. मात्र आजोबा आणि नातू या दोघांनाही पोहता येत नव्हते त्यामुळे ते पाण्यात बुडत होते. याचवेळी या ठिकाणाहून जात असलेल्या रोशन संजय टर्ले यास विहिरीतून आवाज येत असल्याचे ऐकले. तो विहिरीजवळ जातच त्याला हे दोघे बुडत असल्याचे दिसून आले. टर्ले यांनी प्रसंगावधान राखत आपत्ती व्यवस्थापनाला माहिती दिली.

चांदोर येथील आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. एका खाटेला चारी बाजूंनी दोर बांधत ही खाट खाली सोडण्यात आली. आणि रेस्क्यू टीमचे काही कर्मचारी विहिरीत उतरले आणि या दोघांना एक-एक करत खाटेवर टाकत वर काढण्यात आले. या संदर्भातला रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या या कृतीचे चांदोरीसह परिसरात कौतुक केले जात असून यापूर्वी देखील समितीने अनेक ठिकाणी शोधकार्य करत प्रशासनाला मदत केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790