नाशिक: मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार करून 10 लाखांची खंडणी मागणारे दोघे गजाआड
नाशिक (प्रतिनिधी): मोबाईलवर ओळख करून अश्लिल व्हिडीओ व फोटो तयार केले व ते फॉरवड करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोन युवकांना बिहार राज्यातून उपनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपनगर पोलीस ठाण्यातील हद्दीतील एका अल्पवयीन मुली सोबत भावना साहू या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले.
त्यावरून चॅटिंग सुरू केली व मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला.
मात्र मुलीने त्यास नकार दिल्यानंतर वेगवेगळ्या फोनवरून तिला त्रास देण्याचे काम सुरू केले. तसेच मुलीचा चेहारा एडिट करून त्या खाली अश्लील व नग्न मुलीचे शरीर लावून फोटो तयार केला आणि तो पीडित मुलीस पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या नंतर त्यांनी पीडित मुली कडून तिचा फेसबुक आय डी व पासवर्ड घेतला व त्या वरून संपर्क करून तिच्या कडून दहा लाखाची खंडणी मागु लागले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी मुलीला व्हिडीओ कॉल करून त्याद्वारे नग्न चित्रण केले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित मुलीने घरी हा प्रकार सांगितल्या नंतर २३ जून२०२१ रोजी उपनगर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम, माहिती तंत्रज्ञान अधि, कलम ६७ अ,६७ च प्रमाणे दाखल केले.
सदरचा तपास पोलीस आयुक्त दिपक पांडेय, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ बटुळे, सुनील लोहरे, मुकेश क्षीरसागर, अनिल शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक शहर यांची मदत घेऊन बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्यातील इटाढीमध्ये जाऊन संशयिताचे मोबाईल लोकेशन प्राप्त करून अविकास अजय कुमार मिश्रा उर्फ बिकास शाहू सिलोत समस्तीपूर बिहार व बनारसी गणेश दुबे बक्सर,बिहार यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन, एक जिओ डोंगल जप्त केले आहे.