
नाशिक मुंबई महामार्गावर पूल चढतांना कार पलटी होऊन अपघात; प्रवासी बचावले
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मुंबई महामार्गावर पूल चढतांना नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून खाली कोसळली.
वेग जास्त असल्याने या अपघातात कारने पलटी मारली.
मात्र सुदैवाने कारमध्ये असलेले प्रवासी बचावले.
मुंबई- आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास नाशिक महामार्ग उड्डाण पुलावर मुंबई कडून धुळ्याला भरधाव वेगाने जात असलेली किया सोनेट कार (क्र.एम एच ४६ बी झेड ६०११) हॉटेल दिव्य अभिलाषा समोरील पूल चढत असताना कारचालकाचे नियंत्रण सुटून कार पलटी होत पुलावरून खाली कोसळली.
- नाशिक: पिता- पुत्र जगदीश आणि प्रणव जाधव यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा…
- नाशिक हादरलं: ‘या’ कारणामुळे मित्रांनीच केली प्रथमेशची हत्या…
- नाशिक: पौर्णिमा बस स्टॉप येथे झालेल्या हत्येचा उलगडा; तीन संशयित ताब्यात
या अपघातात कारचा चक्काचूर झाला असला तरी सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
पालघर येथील सुनील जैन व त्यांच्या सोबत दोन महिला या गाडीतून प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस तसेच अग्निशामक दलाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशामक दलाच्या बचाव पथकाचे अधिकारी शाम राऊत, कर्मचारी ज्ञानेश्वर दराडे, सोमनाथ थोरात, किशोर पाटील, विजय शिंदे,सायली काथवटे यांनी घटनास्थळी बचावकार्य केले. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.