नाशिक: “मी इथला भाई आहे” म्हणत पोटाला चाकू लावत चोपडा लॉन्सजवळ दुचाकीस्वाराला लुटले

नाशिक: “मी इथला भाई आहे” म्हणत पोटाला चाकू लावत चोपडा लॉन्सजवळ दुचाकीस्वाराला लुटले

नाशिक (प्रतिनिधी): दुचाकीस्वारास अडवून त्याच्या पोटास चाकू लावून खिशातील पाच हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना कोशिरे मळ्याजवळ घडली.

फिर्यादी हरी विठोबा गुडगर (रा. क्रांतीनगर, पंचवटी, नाशिक) हे 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलास गंगापूर रोड येथून क्‍लासमध्ये घेण्यासाठी एमएच 04 जीएक्स 0910 या क्रमांकाच्या मोटारसायकलीने जात होते.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

गुडगर हे कोशिरे मळ्याजवळ आले असता अज्ञात इसमाने त्यांची मोटारसायकल अडवली व गुडगर यांच्याजवळ येऊन त्यांच्या पोटाला चाकू लावला व त्यांच्या खिशात असलेली 5 हजार 20 रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. “मी इथला भाई आहे. तू पोलिसात तक्रार केलीस, ती तुझा गेम करीन,” अशी धमकी देऊन चोरटा पळून गेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790