नाशिक: मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

नाशिक: मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याचा राग आल्याने १५ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

वरद प्रितम भालके (१५) या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर येथे शनिवारी (दि.१४) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

दहावीत गेलेल्या या विद्यार्थ्यांने राग अनावर झाल्याने हे कृत्य केल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

सिन्नरमधील देवी रोड परिसरातील राम नगरीतील अमित सुरेश गजेकर (४३) यांचा भाचा वरद (१५) याच्या मित्राचा शनिवारी वाढदिवस होता.

यासाठी जाण्याची त्याने तयारी केली. मात्र, घरच्यांनी वाढदिवस कार्यक्रमात जाण्यास विरोध केला. त्यामुळे तो आतल्या खोलीत जाऊन बसला. याच दरम्यान कुटुंबातील टीव्ही बघत होते. बराच वेळ होऊनही वरद बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता वरदने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चेतन मोरे तपास करत आहे.
नाशिक: मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यापाऱ्यांना कारने चिरडले; एक ठार, एक गंभीर जखमी
नाशिकमध्ये वीजपुरवठा होतोय वारंवार खंडित, लोडशेडिंग सुरु झालंय का ? जाणून घ्या…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group