नाशिक: महामार्ग बसस्थानकावर पर्समधून  4 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

नाशिक: महामार्ग बसस्थानकावर पर्समधून  4 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका महामार्ग बसस्थानकातून विवाहितेच्या पर्समधून ४ लाख २ हजारांचे सोन्याचे दागिने चोरी झाले. शनिवार (ता.२७) दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली.

महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वसई पालघर येथील प्राजक्ता राऊत नाशिक येथे माहेरी आल्या होत्या. शनिवारी घरी परतण्यासाठी मुंबई नाका महामार्ग बसस्थानकावर आल्या. पावणेदोन वाजता वसई पालघर बस महामार्ग बसस्थानकात आली. बसमध्ये बसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सोन्याचे दागिने असलेली पर्स त्यांच्या गळ्यात होती.

हे ही वाचा:  नाशिक: गोणीत आढळलेल्या महिलेच्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली !

बसमध्ये बसताच त्यांनी पर्सची तपासणी केली. पर्सची चैन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पर्समधील सोन्याचे दागिने तपासले त्यावेळी दागिने मिळून आले नाही. गर्दीची संधी साधत अज्ञात संशयिताने पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, नेकलेस, कानातील झुबे, टॉप्स आणि नथ असे सुमारे १३४ ग्रॅम ४ लाख २ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची खात्री झाली.

हे ही वाचा:  नाशिक: पैसे दिले नाहीत म्हणून आईलाच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

त्यांनी मुंबई नाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. यापूर्वीही बस स्थानकावरून अशाच प्रकारे गर्दीची संधी साधत पर्समधून सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.

बसस्थानक जणू सोन्याचे दागिने चोरीचे हॉटस्पॉट ठरत आहे. काही दिवसापूर्वी येथूनच वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. तर गेल्या शनिवारी द्वारका बस स्थानकावरून महिलेच्या पर्समधील सुमारे दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली होती.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; चार जण बुडाले

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790