नाशिक: भाडेकरूचा घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

नाशिक: भाडेकरूचा घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

नाशिक (प्रतिनिधी): जीवे मारण्याची धमकी देत भाडेकरूनेच घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: द्वारका उड्डाणपूलावरील अपघातप्रकरणी ट्रकचालकासह मालकाला ठोकल्या बेड्या

विशाल रन्नवरे (३० रा. रोकडोबावाडी, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांच्या शेजारी राहतात. तक्रारदार महिलेच्या घरातील एका रूममध्ये संशयित भाडेतत्वावर राहतो. घरमालकाकडे त्याचे येणे जाणे असल्याने पीडितेशी त्याची ओळख होती.

हे ही वाचा:  राज्यात ढगाळ वातावरणामुळे गारठा कमी, पण 'या' भागांत थंडीचा कडाका वाढणार

गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी रन्नवरे याने मुलीला आपल्या रूममध्ये बोलावून घेतले. तिच्या अंगलट केले.  तुला मारून टाकेन, नदीत फेकून देईल, अशी धमकी देत त्याने बलात्कार केला. यानंतरही त्याने सुमारे वर्षभर वेळोवेळी धमकी देत मुलीवर बलात्कार केला. संशयिताचा अत्याचार वाढल्याने पिडीतेने आपल्या आईकडे आपबिती कथन केली. त्यामुळे हा प्रकार पोलिसात पोहचला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार होणारी ‘जीआयएस’ ची यंत्रणा अंतिम करावी- डॉ. प्रवीण गेडाम

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790