नाशिक: ब्लॅकमेल करत भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर सलग दोन वर्षे बलात्कार

नाशिक (प्रतिनिधी): भोंदूबाबा आणि भावाने मिळून आईसह तीन मुलींवर तब्बल दोन वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवल्या शहरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुफी अजीज अब्दुल बाबा व जब्बार शेख या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  जायकवाडीसाठी गंगापूर, मुकणे धरणातून आज विसर्ग !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे लग्न जमत नसल्याने तालुक्यातील नागडे गावातील महिला एका बाबाकडे गेली. बाबाने मुलीला जादूटोणा झाला असल्याचे सांगितले. जादूटोणा झाल्याचं ऐकून आई घाबरली. आईला घाबरलेलं पाहून भोंदूबाबने त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. यानंतर तिघांनाही चाकूचा धाक दाखवला.

नाशिक: डॉ. सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा…

चाकूचा धाक दाखवून तिघांवर भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने बलात्कार केला. या बलात्काराचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. नंतर व्हिडिओ शुटिंगचा गैरफायदा घेत भोंदूबाबने आई आणि तिच्या तीनही मुलींना ब्लॅकमेल केलं. तिघांवर गेल्या दोन वर्षे आणि चार महिने बलात्कार करण्यात आला. तसेच आईकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. आता पर्यंत आठ लाख रुपये उकळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अद्वय हिरे यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; जामीन फेटाळला

फिर्यादिने दिलेल्या तक्रारीनुसार येवला शहर पोलीस ठाण्यात कलम 376, पोस्को, आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी सुफी अजीज अब्दुल बाबा व जब्बार शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास येवला पोलीस करत आहेत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790