नाशिक ब्रेकिंग: द्वारका परिसरात झोपडपट्टीत आग; गॅस सिलेंडरचा स्फोट
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील द्वारका परिसरातील संतकबीर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे…
आगीचं कारण मात्र अजून समजू शकलं नाही. गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या आगीदरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली…
- नाशिक: मोबाईल दुकानात चोरी करणारे संशयित अटकेत; ६५ हजार रुपयांचे मोबाईल जप्त
- नाशिकमध्ये तापाचे ३००० रुग्ण; अतिसार, डेंग्यू, स्वाइन फ्लूने डोके वर काढले
याबाबत अधिक माहिती अशी, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास द्वारका परिसरातील संत कबीरनगर येथेआग लागली.. काही वेळानंतर गॅस सिलेंडरचा स्फोटही झाला. सुदैवाने या स्फोटात व आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या आगीत आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच झोपडपट्टी भरगच्च असल्यामुळे मागील अर्ध्या तासापासून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतमध्ये जाण्यास अडचण येत असल्यामुळे आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. (शेवटची अपडेट प्राप्त: सायंकाळी ७ वाजता)