नाशिक: बिटकोला ट्रकने दिलेल्या जबर धडकेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

नाशिक: बिटकोला ट्रकने दिलेल्या जबर धडकेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक दुर्दैवी घटना मनाला चटका लावून जाताय..

असाच एक प्रकार नाशिक- पुणे रोडवर घडला आहे.

नाशिक-पुणे रोडवरील बिटको पोलीस चौकीसमोरच ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

सौरभ विजय मंडलिक (२५, रा. थोरात मळा, तपोवन, पंचवटी) असे मयत युवकाचे नाव आहे. पुणे रोडवरील बिटको चौकीसमोर नाशिकरोडकडून द्वारकेच्या दिशेने ट्रक (एनएल ०१ एएफ १३१९) जात होता. तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी (एमएच १५ बीवाय ८८४) यांच्यात धडक झाली. यात ट्रकचालकाच्या बाजुने चाकाखाली दुचाकीस्वार सापडल्याने त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. रुग्णवाहिकेतून त्यास जिल्हा रुग्णालया दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group