नाशिक: फोटोग्राफर्सना मारहाण करून आलिशान कारसह कॅमेरे पळवले

नाशिक (प्रतिनिधी): धुळे जिल्ह्यात फोटोग्राफीची ऑर्डर करून सहकारी मित्रांसोबत रात्री उशिरा घराकडे परतत असतांना आडगाव शिवारात नैसर्गिक विधीकरिता फोटोग्राफरने त्याची कार थांबवली.

कारमधून दोघे खाली उतरल्यानंतर त्यांच्यावर तिघा लुटारूंनी हल्ला चढवून बेदम मारहाण केली. त्यानंतर फोटोग्राफरची कार विविध कॅमेऱ्यांसह पळवून नेत पोबारा केला.

फोटोग्राफर फिर्यादी स्वप्नील जगदीश पखाले (रा. रायगड चौक, सिडको, नाशिक) हे धुळे येथून त्यांचे मित्र कीर्तिकुमार पाटील, आनंद भालेराव असे तिघेजण कारमधून (एमएच १७, एएफ १०११) धुळे जिल्ह्यात फोटोगाफीच्या ऑर्डरकरीत गेले होते.

हे ही वाचा:  नाशिक: चेकपोस्टवर कर्तव्यात कसूर, २ पोलिस अमलदारांचे निलंबन

बुधवारी (दि. ३) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास रात्री परतीचा प्रवास करत होते. साडेआठ वाजता कीर्तिकुमार यांना मनमाडला फोटोग्राफीचे काम असल्याने त्यांना मनमाड येथे उतरवून दोघे पुन्हा कारने नाशिकच्या दिशेने निघाले. रात्री एक वाजेच्या दरम्यान लघुशंका लागल्याने ते कारसह आडगाव शिवारातील मनुमता मंदिर फलकाजवळ थांबले. त्यावेळी अंधारात आलेल्या तिघांनी त्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

हे ही वाचा:  नाशिक लोकसभा मतदार संघात "इतके" टक्के मतदान

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कळस; नाश्ता केला, पैसे मागितले तर स्वीट्स मालकाला मारहाण.. Video

त्यावेळी मित्र गाडीकडे गेला असता, त्याच्या पोटात लाथ मारली. कारसह त्यात ठेवलेले तब्बल चार लाख रुपये किमतीचे कॅमेरे व अडीच लाख रुपये किमतीची कार असा साडेसहा रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला.

नाशिक: जुनी कुरापत काढून चार ते पाच जणांच्या टोळक्याचा युवकावर जीवघेणा हल्ला Video

हे ही वाचा:  नाशिक: कणगा आर्ट फाउंडेशनतर्फे तरुणाईच्या चित्रांचे प्रदर्शन

कार सापडली बेवारस अवस्थेत:
आडगाव शिवारातून जबरी लूट करून पळवून नेलेली फोटोग्राफरची ह्युंदाई वर्ना कार मुंबई-आग्रा महामार्गावर पांडव लेणीजवळ बेवारस स्थितीत पोलिसांना आढळून आली. कारमध्ये असलेले विविध कंपन्यांचे महागडे व्यावसायिक कॅमेरे लुटारूंनी गायब केले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group