नाशिक: फूड डिलिव्हरी करणाऱ्या इसमाची आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील एका खासगी फूड कंपनीतील डिलिव्हरी करणाऱ्या इसमाने आत्महत्या केल्याचा घडला आहे.
म्हसरूळ मधील पुष्पकनगर येथे हा प्रकार उघडकीस आला.
प्रवीण रमेश बिरारी (४५, रा. पुष्पकनगर, म्हसरूळ) असे या व्यक्तीचे नाव आहे.
म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणारे प्रवीण बिरारी हे घरी असताना त्यांनी गळफास लावून घेतला. ही बाब त्यांच्या मुलाच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: ‘सॉरी मला माफ करा’ अशी चिठ्ठी सोडून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत!
नाशिक: उड्डाणपुलावर क्रुझर-कंटेनर अपघातात वृद्धा ठार
नाशिक: ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावत पळवली कार