नाशिक: फसवणूक करून तब्बल ५ वर्षे फरार होता हा पठ्ठा.. अखेर अडकला क्राईम ब्रांचच्या जाळ्यात

नाशिक: फसवणूक करून तब्बल ५ वर्षे फरार होता हा पठ्ठा.. अखेर अडकला क्राईम ब्रांचच्या जाळ्यात

नाशिक (प्रतिनिधी): फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी तब्बल पाच वर्षानंतर क्राईम ब्रांचच्या जाळ्यात अडकला आहे.

विशेष म्हणजे त्याने चौकशीमध्ये आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे..

नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट १ च्या या कामगिरीचं कौतुक होत आहे…

हे ही वाचा:  श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौड संपन्न !

पोलिसांना गुंगारा देत पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. वीरेंद्र वीरबहादूर कौशल (व्य ४२, रा.फ्लॅट क्रमांक ३०३, साईतीर्थ अपार्टमेंट, जेलरोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

म्हसरुळ पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणातील आरोपी २०१६ पासून फरार होता. तेंव्हापासून नाशिक शहर पोलीस त्याच्या मागावर होते. तो मंगळवारी (दि.१८) बिटको पॉईंट, नाशिकरोड येथे येणार असल्याची माहिती नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखली पथकाने आरोपीला पकडण्यासाठी बिटको पॉईंट परिसरात सापळा रचला. तो बिटको पॉईंट परिसरातील धनलक्ष्मी हॉटेलसमोर आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलीस तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी पथकाने त्याला म्हसरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: सावकाराच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १९ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790