नाशिक: प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात घातला दगड; पती गंभीर जखमी
नाशिक (प्रतिनिधी): पती झोपेत असताना प्रियकरासोबत असलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार पाथर्डी फाटा येथे उघडकीस आला.
याप्रकरणी संशयित पत्नी मनीषा गायकवाड व अजय सुरेश जाधव या दोघांच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि दिलीप गायकवाड (रा. दाढेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नी मनीषा आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहे. चार महिन्यांपूर्वी पत्नी तिचा प्रियकर अजय जाधव याच्या सोबत निघून गेली होती.
याबाबत पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोघांना आडगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोन मुलांच्या संगोपनाकरता पत्नीच्या अनैतिक प्रेमसंबधांकडे दुर्लक्ष करत पुन्हा नांदण्यासाठी तिला आणले होते. यानंतर चार-पाच दिवस जाताच पत्नीचा प्रियकर अजय हा घरी आला. दोघांमध्ये संबध सुरू असताना पतीला जाग आली. त्याचवेळी दोघांनी डोक्यात दगड घालत गंभीर जखमी करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पोलिसांत दिली. वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे…