नाशिक: प्रवेश दिल्याच्या नावाखाली जवळपास सव्वाशे विद्यार्थिनींची फसवणूक!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आणि मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापिठांतर्गत येत असलेल्या के. एन. केला महिला महाविद्यालयात सव्वाशे मुलींनी तीन ते साडेचार हजार रुपये फी भरून प्रवेश घेतला.
मात्र, परीक्षेसाठी विद्यार्थिनींचे नावच विद्यापीठात नसल्याने त्यांना ऑनलाइन परीक्षेसाठी कोडच मिळाला नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी सभापती प्रशांत दिवे यांची भेट घेतली. त्यानंतर सविस्तर चौकशीअंती संबंधित महाविद्यालयाने या विद्यार्थिनींची विद्यापीठामध्ये फीच भरलेली नसल्याचे समोर आले.
के. एन. केला महिला महाविद्यालयात नाशिकरोडसह नाशिक, शिंदे, पळसे आणि ग्रामीण भागातील मुली व महिलांनी विविध शाखांमध्ये प्रवेश घेतला आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याचे सांगितले होते. मात्र, एकही क्लास झाला नसल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8122,8114,8103″]
तर मंगळवारी (दि. १४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास या मुलींच्या फोनवर परीक्षेचे वेळापत्रक आले. यामध्ये कला व वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्गातील तसेच एम. काॅम. आणि एम. ए.च्या दुसऱ्या वर्गातील एकूण ११५ मुलींचा बुधवारी (दि. १५) इंग्रजीचा पेपर होता. मात्र, या ११५ मुलींना बुधवारपर्यंत परीक्षेच्या वेळेपर्यंत आॅनलाइन परीक्षेसाठी काेणत्याही प्रकारचा कोड नंबर आला नाही. पेपरची वेळ निघून गेली तरीही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी काही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाशी संपर्क साधला.
महाविद्यालयाने विद्यापीठाशी संपर्क साधा असे सांगितल्यावर हताश मुलींनी विद्यापीठासोबत संपर्क साधला. तेव्हा विद्यापीठाने तुमचा महाविद्यालयात प्रवेशच झालेला नाही. त्यावेळी या मुलींच्या पायाखालची वाळूच सरकली. आपले पैसे तर जाणारच परंतु सोबत वर्षदेखील वाया जाणार असल्याने अनेक मुलींना र’डू कोसळले. वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सभापती प्रशांत दिवे यांच्यासोबत चर्चा केली. दिवे यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी दापोरकर आणि आशिष कुटे यांच्याशी मोबाइलवरून चर्चा केली. तेव्हा दोघांनीही उ’ड’वा’उ’ड’वी’ची उत्तरे दिली. प्राचार्य दापोरकर यांनी आपल्या प्रतिनिधी म्हणून तीन महिला प्राध्यापिका पाठविल्या होत्या, मात्र त्या तिन्ही प्राध्यापिका ते महाविद्यालय सोडण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले.