नाशिक (प्रतिनिधी): कौटूंबिक भांडणातून पोलिसाने सिन्नर तालुक्यातील दोडी दापुर येथील सासरे, सासू व पत्नी यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले.
तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू झाल्याने एकच खबळळ उडाली आहे.
मनमाड पोलिस ठाण्यात दंगा नियंत्रण विभागात कार्यरत असलेले सूरज देविदास उगलमुगले (रा. उपनगर) यांनी दोडी दापूर येथील त्यांचे सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (५८) शिला निवृत्ती सांगळे(५२), पत्नी पुजा सुरेश उगलमुगले यांच्यावर भांडणावरुन दोन दिवसांपुर्वी मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने वार केले होते.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10402,10399,10393″]
नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला असून, शिला सांगळे व पूजा उगलमुगले यांची तब्बेत गंभीर आहे. आरोपीला अटक करावी तसेच आमची तक्रार व गुन्हा दाखल न करणाऱ्या उपनगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यावर कारवाई करावी होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही यासाठी नातेवाईक व ग्रामस्थ अडून बसले होते. पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे व पोलिस उपअधीक्षक तांबे यांनी मध्यस्थी करुन निवृत्ती सांगळे यांचा मृतदेह पोस्टमार्टम जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.