नाशिक: पित्यासोबत जाणाऱ्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले.. एकुलता एक मुलगा गमावला…

नाशिक: पित्यासोबत जाणाऱ्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले.. एकुलता एक मुलगा गमावला…

नाशिक (प्रतिनिधी): आपल्या दिव्यांग पित्यासोबत सायकलवर बसून जाणाऱ्या चार वर्षीय बालकाला ट्रकने चिरडल्याची घटना चेहेडी पंपिंगजवळील गाडेकर मळ्यालगत घडली.

घटनेनंतर ट्रकचालक हा ट्रकसह फरार झाला आहे. या भीषण अपघातात चार वर्षीय अमित करंजीलाल दुर्वे हा चिमुकला जागीच ठार झाला.

माथाडी कामगार असलेले कारंजीलाल यांनी या अपघातात आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे.

🔎 हे वाचलं का?:  दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

चेहेडी पंपिंग खर्जुल मळा येथे दुर्वे हे आपल्या पत्नी व मुलासोबत राहतात. अपंगत्व असलेले करंजीलाल हे रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगार म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा अमित हा घरापासून जवळच राहत असलेल्या काकांच्या घरी गेला होता.

करंजीलाल हे त्याला सायकलच्या पुढच्या दांडीवर बसवून भावाच्या घराकडून आपल्या घरी परतत होते. गाडेकर मळा गणपती मूर्ती कारखान्यासमोर दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास माल धक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या भरून चेहेडी नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून त्यांच्या सायकलला धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हास्तरीय समरसता साहित्य संमेलनाचे आज (दि. २२) आयोजन

या अपघातामुळे पिता-पुत्र खाली रस्त्यावर पडले. त्यावेळी चिमुकला अमित हा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा चिरडून मृत्यू झाला. तर वडील करंजीलाल हे ट्रकच्या विरुद्ध दिशेला पडले त्यामुळे ते बचावले. मुलगा ट्रकखाली सापडून मृत पावल्याची बातमी परिसरात पसरताच मोठी गर्दी झाली होती.

नाशिकरोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चार वर्षांच्या अमितचा मृतदेह तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवला. अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दुर्वे कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एटीएममध्ये कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक

अपघातस्थळी अनेक जण भोवळ येऊन पडले…
अपघाताची भीषणता इतकी होती कि परिस्थिती बघून ये जा करणारी माणसे भोवळ येऊन पडल्याची प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर ट्रकचालक बिनबोभाटपणे ट्रकसह पळून गेला. या घटनेची माहिती कळताच अमितची आई घटनास्थळी धावून आली. तिने आक्रोश करत एकाच टाहो फोडला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790