नाशिक: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
निफाड तालुक्यातील शिंगवे येथे ही घटना घडली आहे.
रोहित कटारे असे मृत मुलाचे नाव आहे.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे…
अधिक माहिती अशी की, रोहित कटारे असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. शिंगवे गावाजवळ खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्याची माती वीट बनविण्यासाठी वापरली जात होती. गेल्या चार दिवसांपासून सुरू पावसामुळे या मोठ्या खड्ड्यात पाणी साचले होते.
रोहित घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना रोहित कधी घराजवळून बाजूला गेला कोणालाच कळले नाही. रोहित दिसत नाही म्हणून कुटुंबातील सर्व नातेवाईक त्याला घराजवळ शोधू लागले. मात्र रोहित न सापडल्याने ग्रामपंचायतीला कळवण्यात आले. नंतर ग्रामपंचायतीने रोहित हरवल्याची माहिती संपूर्ण गावात दिली. रोहितची कुठलीही माहिती मिळत नसल्याने अखेर घराजवळ असलेल्या खड्याच्या पाण्यात बघितले असता रोहितचा मृतदेह आढळून आला.