
नाशिक: पत्नी नांदायला येत नसल्याने जावयाकडून सासूचा खून
नाशिक (प्रतिनिधी): पत्नी नांदायला येत नाही या कारणामुळे राग अनावर झाल्याने जावयानेच सासूचा खून केला,
तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याचे वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जखमी पत्नी व मुलीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
- धक्कादायक: निमाणी बस स्टॅन्डवर सिटी लिंक बसमध्ये बसलेल्या महिलेचा विनयभंग
- नाशिक: पतीने भिशीसाठी पत्नीकडे मागितले पैसे… पत्नीने पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य…
- नाशिक: बहिणीच्या लग्नाच्या 2 दिवस आधीच भावाचा दुर्दैवी मृत्यू
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बु. येथील जोशी कंपनीजवळील पाड्यात ही घटना घडली. बाळा निवृत्ती भुतांबरे (रा. जांभुळवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) याने घोटी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जांभुळवाडी येथील कळमुस्ते येथील किसन महादु पारधी याचा झारवड येथील कमळाबाई सोमा भुंताबरे यांच्या मुलीशी विवाह झाला होता.
संशयित किसन महादु पारधी याला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी इंदुबाई किसन पारधी सासरी नांदावयास जात नव्हती. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संशयित किसन पारधी याने पत्नी सासरी नांदावयास का येत नाही, अशी कुरापत काढून पत्नीच्या गळ्यावर विळ्याने प्राणघात हल्ला केला. यावेळी सासू कमळाबाई सोमा भुतांबरे (५५) व संशयिताची मुलगी माधुरी किसन पारधी, (१२) या भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्या. यावेळी संशयिताने माधुरी पारधी हिच्या हातावर विळ्याने वार केला केल्याने ती गंभीर जखमी झाली तर सासू कमळाबाई भुतांबरे यांच्या पोटात व पाठीत कात्री भाेसकल्याने त्या जागीच ठार झाल्या. तसेच पत्नी इंदुबाई पारधी हिच्या गळ्यावर विळ्याने गंभीर वार केल्याने तीही गंभीर जखमी झाला. संशयित किसन पारधी हाही जखमी झाला.
पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलिस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, सहायक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.