नाशिक: पत्नीच्या अंगावर दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीवर गुन्हा
नाशिक (प्रतिनिधी): घरगुती वादातून पत्नीने घरातून निघून दुचाकीवरुन जात असतांना संशयित पतीने तिच्या दुचाकीवर बसून गाडी भरधाव वेगात चालवत,
तीच दुचाकी अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जुना गंगापुर नाका गंगापुररोड येथे उघडकीस आला.
याप्रकरणी संशयित दिलीप निंबाजी देवरे यांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहिता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती सोबत भांडण झाल्याने पीडित विवाहिता घरातून निघाल्यानंतर फिर्यादीने पाठलाग करत जुना गंगापुर नाका सिग्नल येथे पीडितेच्या दुचाकीवर बसला. घरी चर्चेसाठी यावे असे त्याने सांगीतले. पीडितेने त्यास नकार दिला. तिची दुचाकी हिसकावत, सुरू करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने भरधाव वेगात चालवून नेत असतांना पीडिता खाली पडली. तिच्या पायास दुखापत झाली. संशयिताने पुन्हा दुचाकी अंगावर घालुन तीला गंभीर जखमी केले अशी तक्रार गंगापूर पोलिसांना दिली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
दुर्दैवी: पैसे हरवले म्हणून २२ वर्षीय तरुणीची नाशिकला आत्महत्या…
नाशिक: गर्दी नियमांचे उल्लंघन केल्यास लॉन्स, मंगल कार्यालय सील करणार
नाशिक: मित्राच्या पत्नीला जाळणाऱ्या आरोपीला आजन्म कारावास