नाशिक: पंचवटीत काकाचा पुतण्यावर चाकू हल्ला, पुतण्या गंभीर जखमी
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीच्या हिरावाडीरोड भागात कौटुंबिक वादातून चुलत्याने शिवीगाळ करीत पुतण्यावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत पुतण्या गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक महादू गरड (५५ रा.आपला महाराष्ट्र कॉलनी हिरावाडीरोड) असे चाकू हल्ला करणा-या संशयित चुलत्याचे नाव आहे. याप्रकरणी यश सुरेश गरड (२३) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे शेजारी राहत असून ते काका पुतणे आहेत.
नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
बुधवारी (दि.१५) यश गरड व त्याची आई आपल्या घरात असतांना संशयिताने कौटुंबिक वादातून दोघांना शिवीगाळ केली. यावेळी पुतण्या यश आपल्या चुलत्यास जाब विचारण्यासाठी गेला असता संशयिताने त्यास दमदाटी करीत धारदार चाकूने त्याच्यावर हल्ला केला.
- नाशिकची टोईंग झाली बंद, आता थेट ई-चलानद्वारे दंड वसुली
- नाशिकमध्ये दोन गटांत तुफान राडा; दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न
- Big Breaking: नाशिक शहर: पतीने केले पत्नीवर धारदार शस्त्राने वार; त्यानंतर पतीचा गूढ़ मृत्यू…
या घटनेत यश गरड याच्या दोन्ही हातांवर वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.