नाशिक: नातवानेच चोरले आजीचे दागिने; मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

नाशिक: नातवानेच चोरले आजीचे दागिने; मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): घरात आजी सोडून कुणीही नसल्याची संधी साधत नातू आणि त्याच्या दोन साथीदारांनी आजीला बेदम मारहाण करत तिच्या अंगावरील चोरी केली प्रकरणी वडनेर भैरव पोलिसांनी नातवांसह दोघा संशयित यांना शिताफीने अटक करत गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वडनेर भैरव येथे संशयित सतीश ऊर्फ गणेश बारकू शिंदे, (वय २३, रा.मालसाने) याची आजी राहत असते. आजी घरी एकटीच असल्याची संधी साधत संशयित सतीश याने आजीचे दागिणे चोरण्याचा प्लॅन तयार केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाच्या पहिल्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय…

यासाठी त्याने आपले दोन साथीदार संशयित विशाल पवार (वय २४, रा. करमाळे, ता. कळवण), जलराम ऊर्फ जाल्या किसन पवार (वय २७, एकलहरे वस्ती, कळवण) या दोघांना आजीच्या घराजवळ बोलावून घेतले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: घरगुती सिलिंडरमधून अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग करणारे दोघे ताब्यात !

त्यानंतर तिघांनी आजी घरात एकटी असताना तिला बेदम मारहाण करत तिच्याजवळील सोन्याचे दागिने चोरून नेले.याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख,

वडनेर भैरवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक मदत घेत यातील संशयित नातू सतीश ऊर्फ गणेश बारकू शिंदे यास पळसे (नाशिक) येथून ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पुढील दोन दिवस 'यलो अलर्ट'

यानंतर या दोघा संशयित साथीदार यांना देखील वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अटक करत हा गुन्हा उघडकीस आणला. संशयित सतीश शिंदे याच्यावर यापूर्वी देवळा आणि अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790