नाशिक: धूमस्टाईल पाठलाग! पुष्पा पॅटर्न तस्करीचा डाव उधळला, दोघे संशयित ताब्यात

नाशिक: धूमस्टाईल पाठलाग! पुष्पा पॅटर्न तस्करीचा डाव उधळला, दोघे संशयित ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): तालुक्यातील जंगल परिसर असलेला हरसूल, पेठ, सुरगाणा तालुक्यातील काही भागातून सर्रास खैर लाकडाची तस्करी केली जाते.

काही दिवसांपूर्वी पेठ, वांगणी, हरसूल शिवारात खैर लाकडाची तस्करी रोखली असताना आता बोरपाडा खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील हरसूल, वाघेरा पेठ-सुरगाणा तालुक्यातील काही भाग आदी परिसर जंगलाने व्याप्त असल्याने लाकूड तस्करीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत.

दरम्यान वन पथक धडक कारवाई करत असल्याने काही अंशी गायब झालेली खैर लाकूड तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: हायवा डंपर चोरणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेशातून अटक

वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार साताराचा खैराची तस्करी गुजरात सेमी जवळील जंगलात रोखण्यात यश आले आहे.

सुरगाणा, पेठ या भागात मुसळधार पावसाने आठवडापासून विश्रांती घेतली आहे. यामुळे खैर तस्कराची टोळी  पुन्हा एकदा या भागात सक्रिय होऊ लागली आहे. बाऱ्हे वनपरिक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचत खैराची पळसन वनक्षेत्रातील बोरपाडा येथे खैर लाकडाची तस्करी रोखण्यात यश आले आहे. पिकअप वाहनातून खैराचे वीस नग घनमीटर 0.907 वन कर्मचाऱ्यांनी हस्तगत केले. पळसन वनपरिक्षेत्रातील बोरपाडा वन परिमंडळ अंतर्गत असलेल्या भागातून एका पिकप गाडीतून काही संशयीत व्यक्ती खैराची लाकडे अवैधरित्या वाहून नेणार असल्याची गोपनीय माहिती पळसन वनपथकाला मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता सदर रस्त्यावर हे वाहन आढळून आले.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

सुरगाणा तालुक्यातील पळसन वनपरिक्षेत्रातील बोरपाडा वन परिमंडळ अंतर्गत असलेल्या भागातून एका पिकप वाहनातून खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार नाशिक उपवनसंरक्षक पंजक गर्ग,याच्या मार्गदर्शनाखाली बा-हे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. कवर, तसेच फिरते पथकाचे अधिकारी सुरेश गवारी, तसेच पळसन येथील वनपाल बीसी भोये, वनरक्षक टि एच खाडवी, तसेच खडकमाळचे वनरक्षक वाय एस गावित यांचे पथक तयार केले. गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. मात्र पथकाची कुणकुण लागताच खैर तस्करांनी  फरार होण्यासाठी वाट बदलली.

हे ही वाचा:  नाशिक: जॉबचे आमिष दाखवून ११ युवकांना ६५ लाखांचा ऑनलाईन गंडा

दरम्यान वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ संशयितांचा मागोवा घेत दुसऱ्या वाटेने वाहनाद्वारे त्यांना गाठले. बोरपाडा रस्त्यावरील जात असताना बोरपाडा हद्दीत पथकाने वाहनाद्वारे त्या पिकप गाडीचा पाठलाग सुरू केला. सापळा कारवाई पथकाने खैराच्या लाकडांनी भरलेली गुजरात प्रादेशिक परिवहन विभागाची पासिंग असलेली पिकपगाडी ताब्यात घेत पळसन वनपरिक्षेत्र कार्यालयात आणली.या ठिकाणी वनपरिक्षेत्राचे अधिकाऱ्यांनी वाहनाची जप्ती पंचनामा केला. संशयित पिकप चालकासह अज्ञान तस्करांविरुद्ध पळसन वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group