नाशिक: धक्कादायक: कामाला जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने मुलानेच केली पित्याची हत्या

नाशिक (प्रतिनिधी): शेतात कामाला जाण्यास वडिलांनी सांगितल्याचा राग आल्याने संतापाच्या भरात फावड्याने जन्मदात्या पित्याच्या डोक्यावर वार करुन ठार मारल्याच्या आरोपावरुन दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संशयित फरार झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथील साहेबराव मुरलीधर मालसाने (५५) यांनी त्यांचा मुलगा पप्पु उर्फ हिरामण साहेबराव मालसाने याला शेतात काम करायला जा असे सांगितले.

याचा राग पप्पु याला आला व त्याने मागचा पुढचा विचार न करता संतापाच्या भरात वडील साहेबराव मालसाने यांच्या डोक्यात, पाठीमागे, उजवे हातावर, उजवे पायावर फावड्याने मारुन गंभीर स्वरुपाची दुखापत केली. यात त्यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

त्यानंतर लहान मुलगा गोरख साहेबराव मालसाने यांनी पप्पु मालसाने यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने दिंडोरी पोलिसांनी पप्पु विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट पुढील तपास करत आहेत. तर घटना घडल्यानंतर संशयित पप्पु मालसाने हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790