नाशिक: दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डसमोर प्राचीन वडाचे झाड कोसळले

नाशिक: दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डसमोर प्राचीन वडाचे झाड कोसळले

नाशिक (प्रतिनिधी): शहरात मागील काही महिन्यातील झाड पडण्याचं सत्र सुरूच आहे.

दिंडोरी रोड वरील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील प्राचीन वडाचे झाड कोसळले आहे.

सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

मात्र काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11151,11161,11166″]

यावेळी त्याठिकाणी मोठी रहदारी असते. अधिक माहिती अशी कि, नाशिकच्या दिंडोरी रोड वर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. याठिकाणी जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेती माल विक्री करण्यासाठी आणत असतात. यामुळे या ठिकाणी संपूर्ण दिवस वर्दळ असते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

या ठिकाणी एक बरेच वर्ष जुने वडाचे झाड होते. हे झाड पडायला आले होते. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक हे झाड कोसळले. मात्र झाड कोसळले त्या वेळी रहदारी कमी असल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र रस्त्याने जाणारी एक ऑटो रिक्षा आणि एक मोपेड गाडीचे नुकसान झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

या घटनेने वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यांनतर वाहतूक सुरळीत करून झाड बाजूला करण्याचे काम सुरु होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790