नाशिक: दहावीच्या विद्यार्थ्याला प्राचार्यांकडून मारहाण; उपनगर पोलिसांत तक्रार
नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड येथील स्कॉटिश अकॅडमीच्या एका वर्गातील खिडकीची काच फुटली.
त्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थ्यांना काठीने मारहाण केली आणि
पालकांकडून पाच हजार रुपयांची मागणी केली.
याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेली माहिती तसेच कैलास बबनराव ढिकले यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी (दि. २८) जेलरोड येथील नारायणबापूनगर परिसरातील स्कॉटिश अकॅडमीच्या दहावीच्या वर्गात दुपारी दोनच्या सुमारास खिडकीची काच कुणीतरी फोडली. म्हणून शाळेच्या प्राचार्य रमा रेड्डी यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना काठीने मारहाण केली.
यामध्ये यशराज अनिल ढिकले या विद्यार्थ्यांच्या हातावर, पाठीवर, मांडीवर काठीने मारल्याचे निशाण झाले आहे. तसेच पालकांना शाळेत बोलावून ५ हजार रुपयांची मागणी केली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राचार्य रमा रेड्डी यांच्याविरोधात उपनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.