नाशिक: तापमानाचा पारा चाळिशी पार; पहिल्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद
नाशिक (प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, भुसावळ पाठोपाठ मालेगाव व परिसरातील तापमानाचा वाढता पारा सातत्याने चर्चेत असतो. एरवी मार्चमध्ये तापमान चाळिशी पार करते.
यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे मार्चसह एप्रिलचे दोन आठवडे तापमान सुसह्य गेले. यानंतर शनिवारी (ता. १५) शहरात हंगामातील सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील पारा प्रथमच चाळिशी पार झाल्याने शहरवासीय आज दिवसभर उकाड्याने हैराण झाले होते.
नाशिकमधून STF ने गुड्डू मुस्लिमला ताब्यात घेतलं का ? जाणून घ्या सत्य…
१३ एप्रिलला या हंगामातील सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अवकाळी, ढगाळ वातावरणाने येथील पारा सरासरी ३६ ते ३७ अंश सेल्सिअसवर स्थिरावला होता.
शनिवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या यातच सायंकाळी सातच्या सुमारास सोसाट्याचा वादळी वारा व पावसाचा हलकासा शिडकावा झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
नाशिक: वयोवृद्ध पित्याला मुलाकडून मारहाण, जेवायलाही दिले नाही; पित्याची पोलिसात धाव
उन्हाळ्यात मालेगाव शहराचे तापमान हे मार्चमध्ये चाळिशी पार करते. परंतु यंदा हे घडले नाही. येथील तापमान हे यंदा मार्च अखेर व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाळीशीच्या आत होते. ९ एप्रिलपासून सातत्याने तापमान हळूहळू वाढत आहे.
परिसरात पाऊस होत असल्याने यंदा मार्च व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके फारसे जाणवले नाहीत. एप्रिलच्या प्रारंभी हलक्याशा झळा जाणवू लागल्या असतानाच कसमादे परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने हजेरी लावल्याने उष्णतेची लाट जाणवू शकली नाही. आज प्रथमच सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.