नाशिक: तलवार दाखवून घरात धुडगूस घालणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरातील चेहडी पंपिंग परिसरातील घरात घुसून तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना नाशिक रोड पोलिसांनी अटक करून परिसरात धिंड काढली आहे.
नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेहेडी पंपिंग परिसरात काही सराईत गुंडांनी घरात घुसून तोडफोड घडली होती.
भारती बयास यांच्या तक्रारीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चेहेडी पंपिंग परिसरातील भारती बयास यांच्या घरात पाच जणांनी घुसून तोडफोड केली होती.
“3 फेब्रुवारीच्या मध्यरात्री आम्ही पोलीस आहोत दार उघडा मात्र खिडकीतून बाहेर बघितले असता काही गुंड हातात तलवार घेऊन उभे होते. दार उघडले नाही म्हणून दार तोडून घरात प्रवेश केला. घरातील टीव्ही कपाट आदी सामानाची तोडफोड करण्यात आली तसेच परिसरातील काही खिडक्यांची काच फोडून पळून गेले होते.” असे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.
या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या गुन्ह्यात रोशन पोपट सोनवणे व संदीप शिंदे ऊर्फ हुसळ्या यांना अटक करण्यात आली असून रविवारी परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली तसेच मुख्य आरोपी हे फरार असून गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.