नाशिक: डॉक्टर महिलेचे ‘ते’ फोटो पोर्न साइटवर टाकण्याची धमकी

नाशिक: डॉक्टर महिलेचे ‘ते’ फोटो पोर्न साइटवर टाकण्याची धमकी

नाशिक (प्रतिनिधी): ओळखीच्या तरुणासोबतची मैत्री एका डॉक्टर महिलेला चांगलीच महागात पडली. संशयिताने या महिला डॉक्टरसोबत ओळख वाढवत नको त्या अवस्थेत सोशल मीडियावरील फोटो अपलोड करून हे फोटो पोर्न साइटवर टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सायबर पोलिसांनी संशयित राजेश कपिलदेव सिंग (रा. अश्विननगर) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:  Nashik Breaking: दुभाजक तोडून आयशरची कारला धडक; चार जण जागीच ठार

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित डॉक्टर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित राजेश सिंग याच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत.

संशयिताचे नेहमी घरी येणे-जाणे असल्याने ओळख वाढली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने विविध प्रलोभने देत नको त्या अवस्थेत सोशल मीडियावर कॉल करण्यास सांगून फोटोचे स्क्रीन शॉट काढून घेतले. नेहमी भेटण्यासाठी तगादा लावत असल्याने त्याला नकार दिला असता संशयिताने ऑनलाइन पाठलाग करत मोबाइलवर शिवीगाळ केली. पीडित महिलेचे ते फोटो नातेवाइक व मित्रांना पाठविण्याची धमकी देत भेटली नाही तर हे फोटो व व्हिडिओ पोर्न साइटवर टाकण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडितेने दिली. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक दानिश मन्सुरी तपास करत आहेत.
Amazonवर ह्या वस्तू सर्वात जास्त विकल्या गेल्या.. तुम्ही घेतल्या का ?

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790