नाशिक : टिप्पर गँगमधील तिघांना मोकाअंतंर्गत दहा वर्षाची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): फळ विक्रेत्यास जीवे ठार मारण्याची ध’म’की दिल्याप्रकरणी मोकाअंर्तगत कारागृहात असलेल्या टिप्पर गँगमधील तिघा जणांना मंगळवारी (ता.२८) मोका न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावास आणि २५ लाख रुपयाचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.
२०१६ साली हा गुन्हा अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.
फिर्यादी शुभम भावसार हे घरी जात असताना आरोपी गणेश सुरेश वाघ, किरण पेलमहाले, देवदत्त घाटोळे, मुकेश राजपूत, शाकीर पठाण, हेमंत पवार यांनी शुभम भावसार यांना आवाज देत बोलावून घेत त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी दे नाहीतर तुझ्या आई, वडिलांना ठार मारू अशी ध’म’की दिली.
शुभम भावसार यांनी पाच लाख रुपये देण्यास नकार देताच शाकीर पठाण याने आपल्या जवळील पिस्तूल शुभम यांच्या डोक्यावर लावत ओरडलास तर मा’रु’न टाकण्याची ध’म’की दिली. यानंतर इतर पाच जणांनी शुभम यांना शिवीगाळ व लोखंडी रॉड व तलवारीने वा’र करत बे’द’म मा’र’हा’ण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शुभम यांच्या खिशातील ७ हजार ५०० रुपये चोरून नेले.
याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी संशयितांविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याने व सदरची टोळी ही टिप्पर गँग नावाने प्रसिद्धी असल्याने त्यांना अटक करत त्यांच्याविरुद्ध मोका लावण्यात आला. यानंतर झेंडे, कड, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र सहारे, विशाल मुळे यांनी सहा महिने या गुन्ह्याचा तपास करत सुमारे १२०० पानाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
मंगळवारी (ता. २८) जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील एस. एस. कोतवाल यांनी शासनाची बाजू मांडली. पुराव्यावरून न्यायाधीश यांनी आरोपी गणेश वाघ, मुकेश राजपूत आणि शाकीर पठाण यांना दहा वर्ष सश्रम कारावास आणि २५ लाख रुपयांचा दंड अशी सुनावणी सुनावली. सिडकोतील टिप्पर गॅगविरुद्ध मोकाअंतंर्गत केलेल्या कारवाईनंतर या खटल्यात आरोपींना शिक्षा झाल्याने खऱ्या अर्थाने या प्रकरणी यश मिळाले आहे. यामुळे सिडको व नाशिकमधील गुन्हेगारीवर नक्कीच वचक बसेल.