नाशिक: चहा पितांना ठसका लागून इंजिनीअरिंगच्या युवकाचा मृत्यू

नाशिक: चहा पितांना ठसका लागून इंजिनीअरिंगच्या युवकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): मृत्यू कधी कुणाला कसा आणि कुठे गाठेल याचा काहीच नेम नसतो…

असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे..

चहा पितांना ठसका लागून एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: 'या' दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

चहा पिताना ठसका व नंतर रक्ताची उलटी होऊन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना टिळकवाडीतील महापौर बंगल्यासमोर घडली.

वैभव बाळासाहेब पवार (वय २२, रा. हिंगणी, ता. कोपरगाव, जि. नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तो नाशिकमधील मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. मंगळवारी मित्रांसमवेत तो चहा पीत होता. त्या वेळी त्यास ठसका लागला आणि श्वास घेण्यास त्रास झाला. त्यातच त्याला रक्ताची उलटी झाली. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. शिंदे यांनी मृत घोषित केले. मृत्यूचे कारण कळले नसून त्याच्यावर यापूर्वी क्लिष्ट शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या “या” तारखेदरम्यान रद्द

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790