नाशिक: घराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला
नाशिक (प्रतिनिधी): पस्तीस वर्षीय युवकाने आलेल्या काळावर मात करीत अक्षरश: बिबटयाशी झुंज दिल्याचा प्रक्रार उघडकीस आला आहे. सदर घटना रविवार (ता.७) रोजी रात्री बारा ते साडे बाराच्या दरम्यान मोराडे इस्टेट येथे घडली आहे.
यात युवकाच्या डाव्या हाताला बिबट्याचे दात लागले असून बराच रक्तस्त्राव झाला आहे.
त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
यात युवकाच्या डाव्या हाताला बिबट्याचे दात लागले असून बराच रक्तस्त्राव झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ येथील मोराडे इस्टेट भागात शेतकऱ्याच्या बऱ्याच वस्त्या आहेत, याच ठिकाणी मोरे कुटुंबीयांची यांची शेती आहे आहे. ही शेती बंडू नाना थाळकर कुटुंब सांभाळत असून त्याच जवळपास वीस ते बावीस जणांचं कुटुंब वास्तव्य करते.
यातील काही सदस्य शेतमजूर म्हणून काम करतात तर काही खाजगी कंपनीत काम करतात.त्यांच्या कुटुंबातील जवळपास दहा ते बारा सदस्य हे घरा बाहेरच्या अंगणात झोपलेले होते.रात्री बारा ते साडे बाराच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने भारत बंडू थाळकर वय 35 यांचे हल्ला चढविला त्यांच्या डाव्या हाताला धरून ओढत घेऊन चालला होता.
इतर सदस्यांचा आरडाओरडा सुरू होता .मात्र,त्यावेळी भारत याने बाहेर असलेल्या चुली जवळील लाकूड उजव्या हातात घेऊन बिबट्यास मारले.अन् बिबट्याने धूम ठोकली.या हल्ल्यात भारत यांच्या डाव्या हाताला बिबट्याचे तीन ते चार दात चांगलेच लागले असून रक्तस्त्राव झालं आहे.शासकीय रुग्णालयात उपचार दाखल केले होते. सुदैवाने भारत थाळकर याचे प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यालगत पिंजरा लावण्यात आला आहे.