नाशिक: घरातील लाईट दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यास बेदम मारहाण

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: घरातील लाईट दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यास बेदम मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): बागवानपुरालीत बेळेगल्ली भागात घरातील लाईट दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यास ग्राहकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला ६ जूनपर्यंत यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

तक्रारीनंतर वेळेत न पोहचल्याने ही मारहाण करण्यात आली आहे.

याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज मेहमुद पठाण (४८ रा.बेळेगल्ली,बागवाणपूरा) असे वीज कर्मचा-यास मारहाण करणा-या वीज ग्राहकाचे नाव आहे. पठाण यांच्या घरातील वीज पुरवठा अचानक बिघाड झाल्याने खंडीत झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उद्योगांनी तेल कंपन्यांसमवेतचे खरेदी करार पुनर्संचयित करावेत- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

याबाबत त्यांनी वीज कंपनीस संपर्क साधून माहिती दिली होती. मात्र विज कर्मचारी वेळेत त्यांच्या घरी पोहचले नाही, या कारणातून वाद होवून ही घटना घडली. द्वारका कक्ष १ चे वरिष्ठ तंत्रज्ञ उमेश अंबादास थोराईत (रा.पंचक,जेलरोड) हे रविवारी (दि.२६) रात्री वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्या सहकाºयांसह पठाण यांच्या घरी गेले असता ही घटना घडली. संतप्त पठाण याने वीज कर्मचा-यांना शिवीगाळ करीत थोराईत यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790