नाशिक: गोमांस नेणारा टेम्पो पकडला, वाहन चालक ताब्यात

नाशिक: गोमांस नेणारा टेम्पो पकडला, वाहन चालक ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): मालेगावकडून मुंबईच्या दिशेने २ टन गोमांस घेऊन जात असलेला टेम्पो (MH-41, AU-4131) नाशिकमधील काही जागरुक युवकांनी पकडला. या वाहनासह त्याच्या चालकाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गाडीमध्ये तीन वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबरप्लेट आढळून आल्याने, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:  नाशिक: एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह ४ पेडलर्स नाशिक पोलिसांच्या ताब्यात !

अमिरखान अन्वरखान (रा. मालेगाव) असे पकडण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. गोमांस कुठून आणले आणि कुणाला दिले जाणार होते, याचा पोलीस तपास करत आहेत. आजवर वारंवार अशा गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनांसह आरोपींवर पोलिसांकडून कारवाई झालेली आहे. मात्र, तरीही चोरीछुप्या पद्धतीने दररोज मोठ्या प्रमाणावर गोमांस वाहतूक सुरू असल्याचं यानिमित्ताने पुढे आलं आहे. बनावट नंबरप्लेट बनवण्यामागे पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाची दिशाभूल करण्याचा हेतू असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी यामागील रॅकेटच्या मुळाशी जावं, अशी मागणी केली जाते आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मिरची चौक येथील उड्डाणपुलासाठी ५० कोटी मंजूर; कोंडी फुटणार !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790