नाशिक: गंगापूर रोडवर दुचाकी झाडावर आदळून दोघे ठार; तिसरा तरुण जखमी

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: गंगापूर रोडवर दुचाकी झाडावर आदळून दोघे ठार; तिसरा तरुण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): आनंदवल्लीकडून जेहान सर्कलकडे जात असताना गंगापूर रोडवरील झाडावर आदळून दुचाकीस्वारासह एक ठार तर तिसरा तरुण जखमी झाल्याची घटना घडली.

भरत जसबीर रोकाया (क्षत्रिय) (१९), पंकज रावल (२७) असे मयत दोघांची नावे आहेत. नवीन हेमराज क्षत्रिय (रा.आदित्य अपार्टमेंट, जेहान सर्कल) जखमी झाले.

हे ही वाचा:  नाशिक: भिशीमध्ये गुंतवणूकीस भाग पाडून महिलेची ७६ लाखांची फसवणूक

नवीन हेमराज क्षत्रिय (रा. आदित्य अपार्टमेंट, जेहान सर्कल) या तरुणाच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.१८) रात्री साडेबारा वाजता भरत हा पंकज रावल व नवीन क्षत्रिय यांना नवीन दुचाकीवरून (एमएच १५ इजी ७९७७) ट्रिपल सीट बसवून आनंदवलीकडून जेहान सर्कलकडे जात होता.

त्यावेळी सावरकर नगर बसस्टॉपजवळ दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये भरत जागीच ठार झाला तर पंकजच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर दुचाकीवर बसलेल्या नवीनच्या मांडीचे हाड मोडले. भरतविरोधात गंगापूर पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आला आहे. उपनिरीक्षक भिसे पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group