नाशिक: कंपनी व्यवस्थापकाकडून गर्भवती महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यातील व्यवस्थापकाने आपल्याच सहकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित महाव्यवस्थापक असून संबंधित महिला अधिकारीही याच कंपनीत कामाला आहे.
गरोदर महिला कर्मचाऱ्याचा कंपनी व्यावस्थापकाने विनयभंग केल्याचा प्रकार गंगापूररोडवरील एका कंपनीमध्ये घडला.
- Breaking: नाशिकच्या सेन्ट्रल जेलमध्ये सात तुरुंगाधिकाऱ्यांनीच केला कैद्याच्या खुनाचा प्रयत्न…
- नाशिक: जन्मदात्या आईनेच सुपारी देऊन केली मुलाची हत्या
- नाशिक: शतपावली करतांना वाहनाने दिलेल्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू
गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित कंपनी व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेले दिलेल्या तक्रारीनुसार १५ मे २०२२ रोजी कंपनीमध्ये असताना संशयित कंपनी व्यवस्थापकाने कॅबिनमध्ये बोलावून तुम्ही कंपनीच्या सहकारी कर्मचाऱ्यांना मिसगाइड करता, त्यांना दुसरीकडे नोकरी शोधण्यासाठी दबाव आणतात, असे सांगत पीडित महिलेला तुम्ही गरोदर आहात, काम होणार नाही. तुम्ही राजीनामा द्या, असे सांगितले पीडित महिलेने नकार दिला. संशयित व्यवस्थापकाने या महिलेचा विनयभंग केला. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.