नाशिक: एसटीची दुधाच्या वाहनाला जोरदार धडक; चार प्रवासी जखमी

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर-नाशिक महामार्गावर येथील एल अ‍ॅण्ड टी फाट्याजवळ एसटी बसचे ब्रेक न लागल्याने बसने समोरुन येणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडक दिल्याची घटना आज (दि.8) दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास घडली. अपघातात बसमधील 4 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…

शहापूर आगाराची बस क्र. एम. एच. 06/ एच. 8560 ही शिर्डीवरुन जवळपास 40 प्रवासी घेऊन शहापूरकडे निघाली होती. मात्र, सदर बस ही चालकाच्या बाजुने ओढली जात असल्याने चालकाच्या लक्षात आले. सिन्नर बस स्थानकात बस आल्यानंतर चालकाने येथील तांत्रिक कामगारांकडून बसची किरकोळ दुरुस्तीही करुन घेतली.

हे ही वाचा:  नाशिकरोड परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या; सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास

नाशिक: कुरापत काढून कार लुटणारे जेरबंद; सीसीटीव्हीच्या आधारे लागला लुटारूंचा शोध !

मात्र, बसमध्ये मोठा बिघाड असल्याचे येथील तांत्रिक कामगारांकडून चालकाला सांगण्यात आले. त्यामुळे हळूहळू जाण्याचा सल्लाही त्यांनी चालकाला दिला. त्यानंर सिन्नर बस स्थानकातून नाशिकच्या दिशने निघाली होती. मात्र, अवघ्या 3 ते 4 किमीवर जाताच बस पुन्हा एका बाजूला ओढू लागली. जिंदाल फाटा परिसरात बस आल्यानंतर येथील उतारावरुन बस एका बाजूला ओढू लागल्याने चालकाने ब्रेकही लावण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

नाशिक: मित्रांसोबत सहलीसाठी गेला, टेंटमध्ये राहिला; सकाळी आंघोळीसाठी गेला आणि आक्रित घडलं

अखेर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस समोरुन येणाऱ्या संगमनेर येथील राजहंद दुध संघाच्या वाहनाला जाऊन धडकली. सुदैवाने बसचा व समोरील वाहनाचा वेग कमी असल्याने मोठे संकट टळले. मात्र, बसमध्ये चालकाजवळ बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिक यात जखमी झाले तर इतर 3 प्रवाशांही किरकोळ जखमी झाले आहे.

हे ही वाचा:  २ महिन्यांच्या मुलीची ५ लाखांत विक्री; नाशिकमधील आईसह ९ जणांना अटक !

स्थानिकांनी मदत करत जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीसही खोळंबा झाला होता. महामार्ग पोलिस व एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group