नाशिक: सापडलेला मोबाईल परत करण्यासाठी गेलेल्या तरुणास मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): मोबाइल फोन करणाऱ्या तरुणाला नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात पतीसह पत्नी व दोन संशयितांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. अप्रत्यक्ष वादातून झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

नितीन गणपत जाधव (३०, रा. हिसवळ, नांदगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दाम्पत्यासह दोन संशयितांवर वाढीव कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 वन विभागाला सांगितले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आढळलं भलतंच !

अंबड पोलिस ठाण्यात मयत नितीनचे वडील गणपत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पती नीलेश ठोके, पत्नी पल्लवी ठोके, साथीदार प्रसाद मुळेसह आणखी एकावर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. गणपत जाधव यांनी १२ एप्रिल रोजी पोलिसांत मुलाला मारहाण झाल्याची फिर्याद दिली होती.

हे ही वाचा:  SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; इथे पहा निकाल…

👉 नाशिक: घाट चढतांना ब्रेक फेल होऊन गाडीने घेतला पेट

याप्रकरणी पोलिसांनी संशयित नीलेश आणि प्रसादला अटक करून न्यायालयात हजर केले होते. पोलिस कोठडीनंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या दरम्यान, रविवारी (दि. १६) दुपारी नितीन जाधव याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी वाढीव कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

काय आहे प्रकरण?:
मृत नितीन हा नोकरीच्या शोधात अंबड एमआयडीसीत आला होता. त्याला ७ मार्च रोजी एक मोबाइल सापडला. हा मोबाइल ठोके दाम्पत्याचा असल्याने ते फोन करीत होते. यादरम्यान, नितीनला संशयित पल्लवी यांनी त्यांच्या मोबाइलवरून फोन केला. यानंतर नितीनने पुढील कॉल पल्लवी यांच्या मोबाइलवर केले. यावेळी नितीनने आक्षेपार्ह संवाद साधल्याचा संशयितांचा दावा होता. मोबाइल घेण्यासाठी नितीनला त्रिमूर्ती चौकात बोलावून घेत ठोके दाम्पत्याने साथीदारांसह हल्ला केला. लोखंडी रॉडच्या हल्ल्यात नितीन गंभीर जखमी झाल्याने त्याला सिव्हिलमध्ये दाखल केले. त्यावरून १२ मार्च रोजी अंबडमध्ये गुन्हा दाखल होता. तर, ‘एमआरआय’ करण्यासाठी नितीनला आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे संशयितांवर मारहाणीच्या गुन्ह्यानंतर आता खुनाचा वाढीव कलम लावण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group