नाशिक: आईने अंडी उकडत ठेवली; अंगावर उकळतं पाणी पडून बाळाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): कुटुंबीयांसह पालकांनी लक्ष न दिल्यामुळे अनेकदा लहान मुलांसोबत अनुचित प्रकार घडल्याच्या घटना नाशिक जिल्ह्यात यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे पालकांनी वेळोवेळी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. काही क्षणासाठी लहान मुलांपासून लक्ष विचलित झालं तर कुटुंबियांना मोठा धक्का सहन करावा लागतो. अशाच दोन घटना जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात घडल्याचे समोर आले आहे.

पहिली घटना मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मनमाड तालुक्यातील रापली रोड नजीक केकान नगर येथे राहणारे बोरसे कुटुंबियांच्या घरात ही घटना घडली आहे. या घटनेत दोन वर्षाच्या मुलाचा दुर्दैव मृत्यू झाला असून ओंकार सुनील बोरसे असे या लहान मुलाचे नाव आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

रात्री आठ वाजता ओंकारची आईने गॅसवर अंडी उकडत ठेवली होती. यावेळी ओंकारने खेळता खेळता गॅस ओढल्याने उकळते पाणी त्याच्यावर अंगावर पडल्याने तो भाजला गेला. त्याला जखमी अवस्थेत आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

दुसरी घटना हरसुल पोलीस स्टेशन अंतर्गत सारस ते गावात ही घटना घडली आहे. अंगावर गरम पाणी पडल्याने सारस्ते येथील सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊ वाजता आंघोळीसाठी पाणी गरम करण्यात येत होते. याच वेळी हा सहा वर्षे मुलगा पाणी गरम करत ठेवलेल्या भांड्याजवळ गेला असता धक्का लागून गरम पाणी त्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीररित्या भाजला गेला. कुटुंबीयांच्या ही घटना लक्षात येताच त्याचे आजोबा मंगळू सोनू चौधरी यांनी हरसुल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना या बालकाचा मृत्यू झाला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790